पुणे दिनांक २ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेले ब्रिटिश कालीन भाटघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसाळधार पाऊस झाल्याने ते आता धरण जवळपास ९८ टक्के भरले असून आज शुक्रवारी पुणे जलसंपदा विभागाच्या वतीने सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी धरणांतील ४५ स्वंयचलित दरवाजांची चाचणी घेण्यात आली, धरणांच्या सर्व स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग नीरा नदीच्या पात्रात सोडण्यात आला दरम्यान ३१ हजार क्युसेकने पाणी सोडल्यानंतर १० मिनिटांनी विसर्ग बंद करण्यात आला आहे.