पुणे दिनांक २ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्य माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली येथील पतियाळा हाऊस कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.मात्र या अटकेपूर्वीच तिने आता पलायन केल्याची माहिती एका वृत्त वाहिनीच्या सूत्रां कडून दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताच पूजा ही फरार झाल्याची शक्यता आहे.त्यामुळे आता तिच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांचे पथक रवाना होणार आहे.अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बनवा बनवी व फसवेगिरी केल्याच्या आरोपावरून दोनच दिवसांपूर्वी ‘ युपीएससी’ ने पूजा खेडकर हिची निवड रद्द केली आहे.त्यानंतर काल गुरुवारी दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील फेटाळला.तसेच याप्रकरणी खेडकर हिच्या वरील आरोपाचा तपास ‘ युपीएससी ‘ व लालबहादूर शास्त्री अकादमीच्या वतीने सुरू आहे.तसेच अनेक दिवसांपासून पूजा ही नाॅट रिचेबल आहे.दरम्यान पूजा खेडकर हिने २०२२ सालच्या बहुविकलांगता या प्रवर्गातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती.यावेळी तिने अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते.दरम्यान ही बनवाबनवी उघडकीस आल्या नंतर पूजा खेडकर हिच्या विरोधात युपीएससी कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी तिला तीन वेळा समन्स पाठवून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते.पण ती हजर झाली नाही.