पुणे दिनांक २ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आज शुक्रवारी मोठा दिलासा दिला आहे.त्यांना बजावण्यात आलेले अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.तसेच यावेळी कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना माध्यमांशी बोलताना कोर्टाचा अवमान होईल असे वक्तव्य करु नये.यावेळी अशी समज देखील दिली आहे.दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे.सदरचे हे प्रकरण सन २०१३ मधील आहे.याप्रकरणी शिवाजी नगर येथील न्यायालयात तारखेला हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात शिवाजीनगर न्यायालयाने अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.त्यानंतर त्यांनी आज शिवाजीनगर न्यायालयात ते आजारी असल्याने रुग्णवाहिकेतून दाखल झाले होते.यावेळी न्यायालयात मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद केला की मनोज जरांगे पाटील हे आजारी असल्याने ते न्यायालयात तारखेला उपस्थित राहिले नाही.त्यांचा कोर्टाचा अवमान करण्याचा हेतू नव्हता.तरी त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात यावे.तसेच जरांगे पाटील हे आजारी असल्याचे त्यांच्या डाॅक्टरचे प्रमाणपत्र व त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराची कागदपत्रे यावेळी न्यायालयात दाखल केली होती.