पुणे दिनांक २ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सातारा येथील मायणी येथील हिम्मत देशमुख यांच्या घरी घडीचे पथक हे आज शुक्रवारी सकाळीच १५ ते १६ वाहनांच्या ताफ्यासह दाखल झाले आहेत.दरम्यान मेडिकल कॉलेज मधील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी साठी हे पथक त्यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत.याच प्रकरणी आप्पासाहेब देशमुख व एम.आर.देशमुख यांना मागील दोन वर्षांपासून ईडीने अटक केली आहे.मायणीत असणाऱ्या मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएस बोगस ऍडमिशन व आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी या दोन्ही भावांना अटक करण्यात आली होती.हिम्मत देशमुख हे त्यांचे पुतणे आहेत.व त्यांच्या चौकशी साठी घडीचे पथक हिम्मत देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे.दरम्यान मायणी मेडिकल कॉलेज गैरव्यवहार प्रकरणात हिम्मत देशमुख यांचा सहभाग आहे का? याबाबत ईडीच्या वतीने तपास करण्यात येत आहे.अशी माहिती मिळत आहे.दरम्यान घरातील सर्वांचे मोबाईल हे स्विच ऑफ येत आहे.दरम्यान ईडी च्या वतीने सदरच्या चौकशी बाबत अत्यंत गोपनीयता ठेवण्यात आली आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांन द्वारे मिळत आहे.