Home Breaking News आज सकाळपासूनच पुण्यात मुसाळधार पावसाला सुरुवात

आज सकाळपासूनच पुण्यात मुसाळधार पावसाला सुरुवात

73
0

पुणे दिनांक ४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात आज सकाळपासूनच मुसाळधार पावसाला सुरुवात झाली आहे.तर खडकवासला धरण क्षेत्रात मुसाळधार पाऊस कोसळत असल्याने आज सकाळपासून धरणातून ३५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर मुठा नदीच्या पात्रात केला जात आहे.पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर परिसरातील सोसायटीच्या तळघरात पार्किंग मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे.तर महसूल प्रशासन व पुणे महानगर पालिकेचे वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पुण्यात आता पुन्हा एकदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच हवामान विभागाच्या वतीने पुणे शहर व पिंपरी -चिंचवड व जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

Previous articleनाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर पाच गावांचा संपर्क तुटला
Next articleउजनी धरण ९० टक्के भरले, धरणातून २० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here