Home Breaking News पुण्याला रेड अलर्ट सिंहगड रोडवरील एकतानगर भागात लष्कराची तुकडी तैनात खडकवासला धरणातून...

पुण्याला रेड अलर्ट सिंहगड रोडवरील एकतानगर भागात लष्कराची तुकडी तैनात खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेकने मुठा नदीत पाणी सोडले

76
0

पुणे दिनांक ४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) खडकवासला धरणक्षेत्रात मुसाळधार पाऊस कोसळत असल्याने धरण १०० टक्के भरले आहे.तसेच हवामान विभागाच्या वतीने आज पुण्याला रेड अलर्ट घोषित केला आहे.व आज रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून ३५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीच्या पात्रात केला जात आहे.त्या मुळे सिंहगड रोड वरील एकता नगर परिसरातील  सोसायटीच्या तळघरात पार्किंग मध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर साचले असून पुण्याच्या जिल्हाधिकारी यांनी लष्कराला विनंती केल्यावर लष्कराची एक तुकडी आता तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान आज सकाळपासूनच पुणे महापालिकेचे अग्निशमन दलाच्या जवान व महसूल विभागाचे अधिकारी तसेच लष्कराचे तुकड्या पोलिस यंत्रणा  तसेच इंजिनियर व वैद्यकीय कर्मचारी तसेच आवश्यक वाहने घटनास्थळी दाखल झाले असून.पुणे अग्निशमन दलाच्या जवानांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान भिडे पूल पाण्याखाली कालच गेला आहे.तसेच सिंहगड रोड वरील एकता नगर येथील द्वारका इमारतीच्या बेसमेंट मध्ये आता पाणी शिरले आहे.खडकवासला धरणातून पाण्याचा अजून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.तसेच वारजे येथील भागात देखील मोठ्या प्रमाणावर सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.पुणे महानगरपालिकेच्या वतीने व पुणे  महसूल विभागाच्या वतीने नदीकाठच्या गावांना व भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.भीमा नदीच्या पात्रातून तसेच बंडगार्डन बंधा-यातून उजनी धरणात केला जात असल्याने उजनी धरण हे ७० टक्के भरले आहे.अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या आठवड्यात उजनी धरण हे १०० टक्के भरले जाऊ शकते.दरम्यान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर असून त्यांनी पुण्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला असून जिल्हाधिकारी व महानगर पालिकेचे आयुक्त व सिंचन भवनचे अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करुन त्यांना या पूरस्थिती बाबत सुचना दिल्या आहेत.

Previous articleआज 🐔 चिकन व मटणाच्या व वाईन शॉपच्या दुकानवर गर्दी
Next articleविशाखापट्टणम एक्स्प्रेसच्या एसी डब्यांना आग 🔥

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here