Home Breaking News राज्यात आज अतिमुसाळधार पावसाचा अंदाज, पुणेकरांना पुन्हा सतर्कतेचा इशारा

राज्यात आज अतिमुसाळधार पावसाचा अंदाज, पुणेकरांना पुन्हा सतर्कतेचा इशारा

69
0

पुणे दिनांक ४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यात आज पुन्हा अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.पुणे.पालघर.सातारा.जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.तसेच मुंबई.रायगड.नाशिक. रत्नागिरी.सिंधुदुर्ग.जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तसेच छत्रपती संभाजीनगर.जालना.बीड. लातूर.धाराशिव.परभणी.मुसाळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.तर अकोला.अमरावती.बुलढाणा. नागपूर.चंद्रपूर.वाशिम . गडचिरोली.भंडारा.नाशिक धुळे.नंदूरबार.जळगाव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसाळधर पाऊस कोसळत आहे.लोळवळ्यात देखील २३२ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून आज पहाटे पासून देखील पावसाला सुरुवात झाली आहे.व खडकवासला धरणातून पुन्हा मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात आहे.त्यामुळे २९ हजार क्युसेकने पाणी सोडले जात होते.तो विसर्ग आज सकाळी ११ वाजल्यापासून ३५ हजार क्युसेकने मुठा नदीच्या पात्रात केला जाणार आहे.आता नदीच्या काठावर पोलिस प्रशासन व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.तसेच सिंहगड रोड वरील एकता नगर भागात लष्करला पाचारण करण्यात आले आहे.तसेच पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.पुणे प्रशासनाच्या वतीने स्पीकर वरून अलर्ट देण्यात येत आहे.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नदीकाठ घ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर या भागातील काही घरांचा वीज पुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे.

Previous articleही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची नवीन चाल – अनिल देशमुख
Next articleआज 🐔 चिकन व मटणाच्या व वाईन शॉपच्या दुकानवर गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here