पुणे दिनांक ५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) श्रावण महिन्याला आज पासून सुरुवात होत आहे.तब्बल ७१ वर्षांनंतर पहिल्याच सोमवारी श्रावणाला सुरुवात होत आहे.तर यंदा एकूण पाच श्रावण सोमवार आले आहेत.आज पहाटे पासूनच भाविकांनी महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे.आज धायरी येथील महादेवाच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरला अनेक शिवभक्तांनी आज पहाटेच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती.तर नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आज पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर रांगाच रांगा लागल्या होत्या.दरम्यान हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्त्व असून हा महिना भगवान महादेवाला समर्पित असतो तर शास्त्रानुसार महादेवाची उपासना केल्याने घरात सुख समृध्दी नांदते.तसेच खास करुन महिला श्रावणी सोमवारचे व्रत करतात या उपवासात अन्नाचे सेवन करण्यास मनाई आहे.तर हा उपवासात फक्त फळांवर उपवास करतात.