पुणे दिनांक ५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बांगलादेशाच्या पंतप्रधान हसिना शेख यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी देश सोडून त्या आता भारतामधील त्रिपुराच्या आगरतळावर दाखल झाले आहे.त्यांच्या सोबत त्यांची बहीण देखील आहे.आता बांगलादेशाचा ताबा आता लष्कराने घेतला आहे.थोड्याच वेळात बांगलादेश लष्कराची पत्रकार परिषद होणार आहे.दरम्यान यापूर्वी श्रीलंका मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती,
दरम्यान मागील काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून गृहयुद्ध चांगलेच पेटले होते. त्यामुळे बांगलादेशात मोठे आंदोलन पेटले होते व हिंसाचार सुरू होता.यात ३०० पेक्षा जास्त नागरिक यांचा मृत्यू झाला आहे.पंतप्रधान यांच्या निवासस्थानी लाखोंच्या संख्येने आंदोलक घुसले आहेत.बांगलादेशा मध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे पंतप्रधान हसिना शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी तातडीने बांगलादेशाची राजधानी ढाका येथून भारताच्या दिशेने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पलायन केले आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.