Home Breaking News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यावर

91
0

पुणे दिनांक ५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी पुणे दौऱ्यावर येत असून ते आज पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.आजचा पुण्यातील त्यांचा दौरा हा जुनी सांगवी येथील पुणे महानगर पालिकेच्या शाळेपासून सुरू होणार आहे.आज सोमवारी दुपारी पावणे एक वाजता त्यांच्या दौ-याला सुरुवात होणार आहे.त्यानंतर ते शिवाजीनगर येथील तसेच घोलेरोड.वाकडेवाडी व सिंहगड रोड वरील एकता नगर भागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतील व दुपारी सव्वा एक वाजता पुण्यातील शासकीय विश्रामगृहात प्रसार माध्यमांशी पुणे पूरपरिस्थिती बाबत संवाद साधतील अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleश्रावणात कावड यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना,डिजेच्या तालावर नाचताना ९ शिवभक्तांचा वीजेचा शाॅक लागून मृत्यू
Next articleUPSC च्या निर्णयाविरोधात पूजा खेडकरची सर्वोच्च न्यायालयात धाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here