Home Breaking News श्रावणात कावड यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना,डिजेच्या तालावर नाचताना ९ शिवभक्तांचा वीजेचा शाॅक लागून...

श्रावणात कावड यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना,डिजेच्या तालावर नाचताना ९ शिवभक्तांचा वीजेचा शाॅक लागून मृत्यू

148
0

पुणे दिनांक ५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण देशात श्रावण महिन्याची मोठ्या प्रमाणावर धामधूम सुरू असताना मात्र बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यात काल रविवारी रात्रीच्या सुमारास कावड यात्रेदरम्यान डिजेच्या तालावर नाचत असताना विजेचा शॉक लागून एकूण ९ शिवभक्तांचा यात मृत्यू झाला आहे.तर अन्य तीन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.यात मृतात अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे.

दरम्यान सदर घटनेची सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील सुलतान पूर भागात रविवारी रात्रीच्या सुमारास कावड मात्र काढण्यात आली यात लहान मुले व नागरिकांसह सर्व बाबांच्या जयघोषात डिजेच्या तालावर नाचत होते. यात ट्रॅक्टरच्या ट्राॅलीवर डिजे लावला होता.यात अचानकपणे हायटेन्शन विद्युत प्रवाह वायरला स्पर्श झाला व ट्राॅलीत प्रवाह उतरला यात नाचणा-या एकूण ११ जणांना विजेचा शॉक लागून यात ९ जण यात मृत झाले तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत.दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरा पर्यंत पंचनामा सुरू होता.मात्र या घटनेनंतर गावांवर एकच शोककळा पसरली आहे. श्रावणात अशी घटना घडल्याने अनेक जणांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Previous articleआज पहिला सोमवार श्रावण महिना सुरू
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here