पुणे दिनांक ६ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पालघर जिल्ह्यातील रणकोळ आश्रमशाळांमध्ये एकूण २७ विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा झाली आहे. दरम्यान सोमवारी रात्रीच्या वेळी जेवण केल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांनींना मळमळ व उलट्यांचा त्रास होऊ लागला होता.त्यामुळे तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान कासार उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.उपचारानंतर आता या विद्यार्थ्यांनींची प्रकृती स्थिर आहे.विषेश म्हणजे या आश्रमातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना एकच प्रकारचे जेवण दिले होते.तरी देखील विद्यार्थी पेक्षा विद्यार्थ्यांनाच विषबाधा झाली आहे.