पुणे दिनांक ६ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या ही चांगलीच झपाट्याने वाढत आहे.आज ही संख्या ६६ वर पोहोचली आहे.या रुग्णांत एकूण २५ गर्भवती 🤰 महिलांचा समावेश आहे.दरम्यान झिका रुग्णांच्या संपर्कात असलेल्या सर्व रुग्णांची पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात येत आहे.तसेच रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेच्या वतीने विषेश काळजी घेण्यात येत आहे. आतापर्यंत याय पुणे शहरातील चार रुग्णांचा झिका व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे पुणेकरांनी विशेष करुन गर्भवती महिलांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान पुण्यात झिका व्हायरसची रुग्ण संख्या ६६ वर पोहोचली आहे.तुम्हाला देखील यातील खालील लझणे असल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन उपचार घ्या. डेंग्यू आणि चिकुनगुनिया सारख्या डासांच्या चाव्यातून पसरतो.झिकाची लागण झालेल्या पैकी बहुतेकांना लक्षणे नसतात.ताप.पुरळ.डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात वेदना.तसेच अंगदुखी व सांधेदुखी यांची सौम्य लक्षणे दिसतात.तसेच गर्भवती महिलांच्या गर्भात मेंदुची साईज लहान होऊ शकते.