Home Breaking News ‘लाडकी बहीण योजने ‘ साठी पुणे जिल्ह्यातून ९ लाख ७२ हजार ८१९...

‘लाडकी बहीण योजने ‘ साठी पुणे जिल्ह्यातून ९ लाख ७२ हजार ८१९ अर्ज दाखल हवेली तालुका आघाडीवर

73
0

पुणे दिनांक ६ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने साठी पुणे जिल्ह्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी तब्बल ९ लाख ७२ हजार ८१९ अर्ज दाखल झाले असून आता या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यातील एकूण १३ तालुक्यातून हे अर्ज दाखल झाले आहेत.तर पुणे शहरातून ७५ हजार ८७ अर्ज दाखल झाले आहेत.तर सर्वाधिक अर्ज हे हवेली तालुका येथून आले आहेत.

दरम्यान तालुका वाइज प्राप्त झालेली आकडेवारी या प्रमाणे आहे.सदरची आकडेवारी ही दिनांक ५ जुलै २०२४ ची अशी आहे.१) हवेली तालुका ३ लाख ५४ हजार ९७ . पुणे शहर ७५ हजार ८१७ . बारामती ६८ हजार ६२२ . इंदापूर ६३ हजार ४८६.दौंड ५२ हजार ३४.शिरुर ५७ हजार २८७.जुन्नर ५९ हजार ३१.खेड. ५४ हजार ८०२.मावळ.४६ हजार १३.आंबेगाव.३९ हजार ७५.पुरंदर.३७ हजार ९६७.भोर.२९ हजार ४११. मुळशी २७ हजार ४३४.आणी वेल्हा ७ हजार ७४९  . असे एकूण ९ लाख ७२ हजार ८१९ अर्ज सादर करण्यात आले आहेत.त्यापैकी ८५.५७ टक्के अर्जावर निर्णय घेण्यात आला आहे.तर ७८.७८ टक्के अर्ज मंजूर करण्यात आले आहे.दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.विवाहीत.विधवा.घटस्फोटीत. परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला योजनेसाठी पात्र असेल.वयाची किमान वयोमर्यादा ही २१ वर्षे पूर्ण व कमाल ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत योजनेसाठी पात्र असेल. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बॅक खाते असावे.तसेच लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

Previous articleकोल्हापूरात मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना एट्राॅसिटी कायद्याअंतर्गत अटक
Next articleआजच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाले म्हत्वाचे निर्णय,९ तारखेपासून हर घर तिरंगा अभिमान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here