पुणे दिनांक ८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संभाजीनगर येथे दिव्यांग लाभार्थ्यांना ई- रिक्षाचे वाटप करण्यात आले होते.दरम्यान सदरच्या इ – रिक्षा मध्ये प्राब्लेम असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांना मिळताच ते आज चांगलेच संतापले व त्यांनी दिव्यांगांची फसवणूक केल्याप्रकरणी आक्रमक होत त्यांनी अधिका-याच्या थेट 👂 कानशिलात लगवल्याच्या व्हिडिओ आता समोर आला आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार संभाजीनगर येथे दिव्यांग लाभार्थ्यांना ई – रिक्षा चे वाटप करण्यात आले होते.या वाटप करण्यात आलेल्या ई-रिक्षांमध्ये अनेक प्राॅब्लेम असून यात बॅटरी 🔋 खराब असल्याच्या तक्रारी आल्या नंतर दिव्यांग वित्त महामंडळाचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपनी कडून संभाजीनगरमध्ये आज लाभार्थ्यांच्या रिक्षाची चाचणी घेण्यात आली.दरम्यान यावेळी दिव्यांगांची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू हे चांगलेच संतप्त झाले व त्यांनी यावेळी थेट अधिकारी यांच्या कानशिलात लगवल्याची घटना घडली आहे.