पुणे दिनांक ८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात पावसामुळे सर्वत्र शहरात खड्डे पडले आहेत.आता रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात विद्यार्थी काॅग्रेसने एक वेगळाच उपक्रम सुरू केला आहे.मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा योजने अंतर्गत ‘ खड्डा दाखवा व बक्षीस मिळवा ‘ असा उपक्रम विद्यार्थी काँग्रेस पुण्यात राबवत आहे.दरम्यान या योजने अंतर्गत अत्यंत तीन धोकादायक खड्डे पाठवून जीव वाचवल्या बद्दल पंधराशे रुपये रोख बक्षीस मिळवा असे काॅग्रेसने म्हटले आहे.या योजनेने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न काॅग्रेसकडून होत आहे.असा एक फ्लॅक्स लावण्यात आला आहे.दरम्यान पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सिंहगड रोड.कात्रज.खराडी.चंदननगर.हडपसर या भागात रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.त्याचा वाहन चालकांना हे खड्डे चुकवतांना वाहनांचा अपघात देखील होत आहे.पुणेकर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चांगलेच त्रस्त झाले आहेत.