पुणे दिनांक ८ ऑगस्ट (पोलखोलनमा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पूजा खेडकर यांचे वडील दिलिप खेडकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.दरम्यान पूजा खेडकर यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावे यासाठी दबाव आणल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्या वडिलांवर आहे.आता या प्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.दरम्यान या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी 👮 या अर्जाची दखल घेऊन आज तहसीलदार दीपक आकडे यांना जबाबा बाबत पोलिस स्टेशन मध्ये बोलावले आहे.