Home Breaking News सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी दिलीप खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी दिलीप खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

67
0

पुणे दिनांक ९ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार वादग्रस्त व बंडतर्फ करण्यात आलेल्या आय‌ए‌एस  अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील दिलिप खेडकर यांच्या विरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशन मध्ये दिनांक ८ ऑगस्ट रोजी गुरुवारी रात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया मधील तहसीलदार दिलिप आकडे यांनी याबाबत दिलिप खेडकर यांच्या विरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार बुधवारी दिनांक ७ ऑगस्ट रोजी दिली होती.या अर्जाची चौकशी करून व तहसीलदार आकडे यांचा जबाब नोंदवल्या नंतर दिलिप खेडकर यांच्या विरोधात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली आहे. दरम्यान पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आय‌ए‌एस अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.त्यावेळी स्वतंत्र केबिनची मागणी करण्यात आली होती.व तसेच त्यांनी त्यांच्या खासगी मोटारीवर अंबर दिवा लावल्याने त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. तसेच पूजा खेडकर यांच्या वडिलांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र केबिन द्यावे.यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांच्यावर दबाव आणला होता.दरम्यान पूजा खेडकर हिच्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशी नंतर लोकसेवा आयोगाच्या वतीने त्यांची निवड रद्द केली होती.

Previous article१५ ऑगस्ट स्वतंत्र दिनापूर्वीच दिल्ली पोलिसांना मोठे यश, खतरनाक अतिरेक्याच्या आवळल्या मुसक्या.पुणे इसिस माॅड्यूलशी संबंध
Next articleआज पहाटे मराठी अभिनेते विजय कदम यांचे निधन, मराठी सिनेविश्र्वात शोककळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here