पुणे दिनांक ९ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार १५ ऑगस्ट स्वतंत्रदिनापूर्वीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे.पुणे इसिस माॅड्यूलशी संबंधित अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्या अतिरेक्यावर राष्ट्रीय तपास संस्थानेही लाखोंचे बक्षीस ठेवले होते.रिजवान अली खतरनाक दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. त्याला दिल्लीतील दर्यागंज येथून अटक केली आहे. रिजवान व त्याच्या सहकाऱ्यांनी दिल्लीतील अनेक व्हीआयपी परिसराची रेकी केली होती.
दरम्यान एनआयएकडून रिजवान अली संदर्भात इनपूट दिल्ली पोलिसांना मिळाले होते.त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बायोडायवसिर्टी पार्क येथून त्याला अटक केली आहे.त्याच्याकडून हत्यार देखील जप्त करण्यात आले आहे.यात एक पिस्तूल तीन कारतूस व दोन मोबाईल फोनचा समावेश आहे.याच्या वर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. दरम्यान रिजवान अली हा पुणे आयएसआयएस माॅड्यूलमधील सर्वात मोठा खतरनाक व धोकादायक अतिरेकी आहे.या माॅड्यूलमधून अनेकजणांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.परंतू रिजवान हा फरार होता.त्याने दिल्ली व मुंबई मधील अनेक व्हिआयपी भागांची तपासणी केली होती.रिजवान याला एनआयएने मोस्ट वाॅन्टेडच्या लिस्टच्या यादीत टाकले होते.त्यांने आयईडी तयार करून त्याची चाचणी केली होती.तो त्यातील तज्ज्ञ होता. अतिरेक्यांची स्पेशल सेल टीमकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.