पुणे दिनांक १० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सातारा येथे शांतता रॅलीमध्ये भोवळ आली आहे. भाषण सुरू असतानाच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आणि ते अचानकपणे व्यासपीठावर खाली बसले.यावेळी तत्काळ कार्यकर्त्यांनी त्यांना पाणी दिले.यावेळी जरांगे पाटील यांच्या हाताला देखील कंप फुटल्याचे देखील पाहायला मिळाले. सततचे दौऱ्यामुळे जरांगे यांना थकवा जाणवत आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.आता डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.सततच्या दौऱ्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना थकवा आला आहे.असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.