पुणे दिनांक १० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज पहाटे निधन झाले आहे. विजय कदम यांच्या निधनामुळे मराठी सिनेविश्र्व आणि चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. सन १९८० व ९० च्या काळात एकापेक्षा एक मराठी सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका बजावत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केले होते.पण आज सकाळीच त्यांच्या निधनाच्या न्यूज मुळे त्यांच्या मोठ्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे…
दरम्यान मराठी सिनेविश्र्वाने एक हरहुन्नरी मराठी कलाकार गमावल्याने सिनेविश्र्व आणि चाहत्यांच्या मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार त्यांना कर्करोग झाल्याने मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.आज शनिवारी दुपारी २ वाजता विजय कदम यांच्या पार्थिवावर मुंबईतील अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.दरम्यान विजय कदम यांचे गाजलेले मराठी चित्रपट.राजानं वाजवला बाजा.आनंदी आनंद. इरसाल कार्टी.लावू का लाथ.गोळाबेरीज.ऑन ड्युटी २४ तास.वासुदेव बळवंत फडके.रेवती.देखणी बायको नाम्याची.मेनका उर्वशी.व कोकणस्थ.हे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट होते.