पुणे दिनांक १० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे यासाठी आज शनिवारी वकिलांनी रणशिंग फुंकले आहे.दरम्यान यात सहा जिल्ह्यातील एकूण ३ हजार वकिलांच्या उपस्थित परिषद होत आहे. दरम्यान या परिषदेला कोल्हापूरसह एकूण सहा जिल्ह्यातील वकील मंडळी यात उपस्थित आहेत. यावेळी सरकारने आतापर्यंतच्या लढ्याची दखल घेऊन खंडपीठाचा विषय मार्गी लावावा.अशी म्हत्वपूर्ण मागणी सर्व वकिलांनी केली आहे.अन्याथा तीव्र स्वरूपाच्या लढ्याचा इशाराच यावेळी वकिलांनी दिला आहे. दरम्यान खंडपीठाच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून या वकीलांचा लढा सुरू आहे.