पुणे दिनांक १० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील कल्याणीनगर येथील एक मोठे हाॅटेल हे दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याबाबत सांगितले जात आहे.या हाॅटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.त्यामुळे सतत गर्दीने गजबजलेल्या त्या हाॅटेलला पत्र लिहून धोका असल्याचे पोलिसांनीच कळवलं आहे.तसेच या हाॅटेलमधील डिस्कोथेक रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देत पोलिसांनीच सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
दरम्यान या हाॅटेलमध्ये येणारे लोक दारु पिऊन धिंगाणा करीत असतात.सध्या अतिरेकी कारवाया बाबत अलर्ट आहे.याताच एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करुन बाॅम्बस्फोटा सारखी एखादी दुर्घटना घडवून आणू शकते.यातून पुणे शहरात मोठी दुर्घटना घडून मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.असा स्पष्ट इशाराच पुणे पोलिसांनी यातून दिला आहे. सदरचे पत्र हे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या स्वाक्षरीनेच संबंधित विभागाला पाठविण्यात आले आहे.तसेच या हाॅटेलने आतापर्यंत सरसपणे अनेकवेळा नियमांचे उल्लंघन केले आहे.व या हाॅटेलमध्ये असलेल्या डिस्कोथेक मुळे हाॅटेलच्या जवळपास रहाणां-या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.या हाॅटेलवर यापूर्वी देखील पुणे पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केले आहेत.याचा देखील या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.आता या प्रकरणी पुणे पोलिस देखील अलर्ट मोडवर आले आहेत.