Home Breaking News ठाण्यात काल मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आज मनसे कार्यलयाला पोलिस...

ठाण्यात काल मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आज मनसे कार्यलयाला पोलिस बंदोबस्त

82
0

पुणे दिनांक ११ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ठाण्यात काल शनिवारी रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व उध्दव ठाकरे गटाचे शिवसैनिक यांच्यात कार्यक्रम स्थळी राडा झाल्यानंतर तसेच उध्दव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून उध्दव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ व शेण फेकण्यात आले होते. यावेळी शिवसैनिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.व यातून काही उद्रेक होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी 👮 ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयावर आता पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.दरम्यान दोन दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपा-या फेकल्यावर मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची होत आहे.

Previous articleठाण्यात उध्दव ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी गोंधळ घालणा-या ४४ मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Next articleमी लवकरच बांगलादेशला येईन- शेख हसीना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here