Home Breaking News ‘…तर लाडकी बहीण योजनेचे १.५०० रुपये काढून घेऊ’ ‘हा पैसा 💸 यांच्या...

‘…तर लाडकी बहीण योजनेचे १.५०० रुपये काढून घेऊ’ ‘हा पैसा 💸 यांच्या बापाचा आहे का ?’ – विजय वडेट्टीवार

70
0

पुणे दिनांक १२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर  सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या द्वारे राज्यातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.पण येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला  आशीर्वाद दिला नाही तर हे १ हजार ५०० रुपये बॅंक खात्यातून काढून घेण्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे.तसेच आमचे सरकार सत्तेवर आल्या नंतर १ हजार ५०० रुपयांचे ३ हजार रुपये करु त्या साठी तुमचा आशीर्वाद हवा आहे.असे आमदार रवी राणा यांनी अमरावतीत एका सोहळ्यात बोलताना व्यक्तव्य केले आहे.

दरम्यान या वक्तव्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.विधानसभेच्या निवडणूकीत आशीर्वाद दिला नाही तर लाडकी बहीण योजनेचे १ हजार ५०० रुपये काढून घेणार . आमदार रवी राणाच्या या विधानानंतर काॅग्रेस पक्षाचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.आमदार रवी राणा यांचे हे विधान संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा अपमान करणारे विधान आहे.या बद्दल आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्रातील तमाम महिलांची तातडीने माफी मागावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.हा सरकारचा पैसा 💸 आहे.हा पैसा यांच्या बापाचा आहे का? आता यांची निती दिसली.फक्त विधानसभेची निवडणूकीत मते मिळवण्यासाठी ही योजना आणली.असा आरोप त्यांनी केला आहे.

Previous articleमराठा आरक्षणावर जेष्ठ नेते शरद पवारांची भूमिका
Next articleदौंड मधील जनता काॅलनीतील रोडची दुरावस्था,शरद पवार गटाच्या वतीने दौंड नगरपालिका मुख्याधिकारी यांना पकंज नांदखिले व श्रेयस सोनवणे कडून निवेदन सादर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here