Home Breaking News नागपुरात मोठ्या प्रमाणावर पोलिस भरतीत काॅपी, पोलिस आयुक्तांनी १३ जणांना पाठवले घरी...

नागपुरात मोठ्या प्रमाणावर पोलिस भरतीत काॅपी, पोलिस आयुक्तांनी १३ जणांना पाठवले घरी ; उमेदवारांना मदत करणारे ३ 👮 पोलिसांना केले निलंबित

65
0

पुणे दिनांक १३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार नागपूरात पोलिस भरतीच्या लेखी परीक्षांच्यावेळी मोठ्या प्रमाणावर काॅपी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणात नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी यात काॅपी करणा-या एकूण १३ उमेदवारांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे.तर या उमेदवारांना काॅपी करतांना आपल्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचारी व एक पीएस‌आय यांना देखील निलंबित केले आहे.

दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार नागपूरमध्ये पोलिस भरतीत लेखी परीक्षेदरम्यान काॅपी करणा-या १३ परीक्षार्थींना नागपूर पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी अपात्र घोषित केलं आहे ‌.काही दिवसांपूर्वीच याबाबतची तक्रार आयुक्तां कडे झाली होती ‌दरम्यान सदरच्या तक्रारीत म्हटले होते की.भरतीच्या लेखी परीक्षा वेळी काही विद्यार्थी हे काॅपी करत असताना याकडे पीएसआय व दोन पोलिस शिपायांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.व त्यांना एक प्रकारे काॅपी करणा-यास मदत केली.या तक्राराची पोलिस आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेत एक पीएसआय व दोन पोलिस शिपाई यांना निलंबित केले आहे.व व काॅपी करणा-या एकूण १३ परिक्षार्थीना अपात्र घोषित केले आहे.दरम्यान आयुक्तांच्या या धडक कारवाई मुळे पोलिस कर्मचारी व परिक्षार्थी विद्यार्थी व राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleसिद्धेश्वर मंदिरात भाविकांच्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू ,श्रावण सोमवारीच मोठी दुर्घटना !
Next articleशरद पवारांच्या पुण्यातील मोदीबागेतील घरा बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here