पुणे दिनांक १२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बिहारच्या जहानाबाद मध्ये शंकराला अभिषेक करताना गोंधळ होऊन भाविकांमध्ये चेंगरा चेंगरी झाली या झालेल्या मोठ्या दुर्घटनेत एकूण ८ भाविकांचा मृत्यू झाला आहे.या मृतांत पाच महिलांचा समावेश आहे.तर १२ पेक्षा जास्त भावीक हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.सदरची घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.जखमी झाले ल्या भाविकांना उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.यावेळी पोलिसांनी 👮 लाठीमार केला व नंतर भाविक हे पळापळ करत असताना चेंगराचेंगरी झाली असा भाविकांनी गंभीर आरोप पोलिसांवर केला आहे.
दरम्यान आज सोमवार असल्याने काल मध्यरात्री पासून भाविकांची या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.प्रचंडप्रमाणांवर गर्दी होती.अनेक भाविक हे शंकराला जलाभिषेक करण्यासाठी आले होते.व मोठ्या प्रमाणावर रांग लागली होती.त्यावेळी अचानक पणे धक्काबुक्की झाली.व अनेकजणांनी रांगा मोडली या वेळी पोलिसांनी 👮 लाठीमार केला व भाविकां मध्ये पळापळ झाली व नंतर चेंगराचेंगरी होऊन सदर घटना घडल्याची माहिती मिळत आहे.घटनास्थळी आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टम साठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.