पुणे दिनांक १२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दौंड शहरातील वार्ड क्रमांक ८ जनता काॅलनीतील परीसर.सेंट सेबॅस्टियन हायस्कूल व प्राईम स्क्वेअर हाॅटेल समोरील रस्ता.तसेच गजानन महाराज मंदिर रोड परिसरातील रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणावर झाली आहे.या संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे दौंड शहर अध्यक्ष पंकजभाऊ नांदखिले व शरदचंद्र पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष श्रेयस सोनवणे यांनी दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मॅडम यांना या बाबत लेखी पत्र दिले आहे.याबात मुख्याधिकारी यांनी या भागातील रस्त्यांच्या दुरावस्था बाबत तातडीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले आहे.
दरम्यान या भागातील रस्त्यांचा प्रश्न खूपच जटिल बनला आहे.जनता काॅलनी मध्ये या भागात सेंटस्ब्सेटन हायस्कूल आहे.शाळा सुटल्यानंतर या भागात रोडची दुरावस्था असल्याने शाळेचे विद्यार्थी व पालक यांना रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच या भागात गजानन महाराज मंदिर आहे. मंदिरात वयोवृद्ध महिला व नागरीक हे दर्शनासाठी येतात त्यांना देखील या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो.तसेच या भागातील रहिवासी यांना देखील या रोडच्या दुरावस्थाचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.या भागातील रस्त्याचे दौंड नगरपालिकेच्या वतीने तातडीने काम करावे या मागणीसाठी या भागातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे शहरअध्यक्ष पंकजभाऊ नांदखिले व शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे दौंड शहर अध्यक्ष श्रेयस सोनवणे यांनी लेखी निवेदन दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मॅडम यांना दिले आहे. व या भागातील रस्त्यांचे तातडीने काम सुरू करावे अन्यथा या भागातील रोडवर वृक्षारोपण करण्यात येईल असे सांगितले .यावर मुख्याधिकारी मॅडम यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून या भागातील रस्त्यांच्या समस्या बाबत विचरणा केली असता संबंधित अधिकारी यांनी टेक्नीकल समस्या मुळे या रस्त्याचे काम थांबले आहे.यावर मुख्याधिकारी मॅडम यांनी यातील टेक्निकल समस्या बाबत मी स्वतः जातीने लक्ष घालून शाळा व मंदिर असल्याने या भागातील रस्त्यांची लवकरा लवकर काम सुरू करते असं आश्वासन दिले आहे.