पुणे दिनांक १३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात नाशिक मध्ये आज मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भव्य अशी शांतता रॅलीचा समारोप होणार आहे.याच पार्श्वभूमीवर नाशिक येथील मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयावर व निवासस्थानी पोलिस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.दरम्यान आज मंगळवारी नाशिक येथील तपोवन परिसरातून सीबीएसप्रर्यत मनोज जरांगे पाटील यांची रॅली होणार आहे.त्यानंतर मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला संबोधित करणार आहेत.दरम्यान आज मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा बांधवांनी नाशिक मध्ये जय्यत अशी तयारी केली आहे.