पुणे दिनांक १३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाच्या काका व पुतण्याच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे .दरम्यान यापूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह पुतण्या अजित पवार यांना दिले आहे.याविरोधात काका व जेष्ठ नेते शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.यावर आज सुनावणी होणार आहे.तसेच नागालँड मधील आमदार अपात्रता प्रकरणावर देखील आज सुनावणी होणार आहे.न्यायाधीश सूर्यकांत आणि उज्वल भोयर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार होईल.