पुणे दिनांक १३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक झाली यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.दरम्यान राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.दरम्यान आता या योजनेबद्दल काही आमदार अपप्रचार करतात व काहीही बोलत असतात यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीत मंत्री व महायुती मधील घटक पक्षांच्या आमदारांना चांगलाच दम भरला आहे.लाडकी बहीण योजना बाबत कोणीही बेताल वक्तव्य करुन तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये असे म्हटले आहे.काल महायुतीचे घटक पक्षांचे आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजना बाबत बेताल वक्तव्य केले होते की.आम्हाला आशीर्वाद न दिल्यास तुमच्या बॅक खात्यातून पैसे काढून घेऊ असं अमरावतीत एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षांनी महायुती वर चांगलेच तोंडसुख घेतले होते.आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजना बाबत केलेले वक्तव्य आता महायुतीतील नेत्यांना रुचलेले नाही.त्यामुळेच आजच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री व आमदार यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.