Home Breaking News आजच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे मोठे निर्णय,नगर‌अध्यक्षाचा कालावधी अडीच ऐवजी पाच...

आजच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे मोठे निर्णय,नगर‌अध्यक्षाचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे होणार

103
0

पुणे दिनांक १३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मंगळवारी कॅबिनेटची बैठक झाली यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.शासकीय तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन देणार.तसेच राज्यात एकूण सहा हजार किलो मीटर रस्त्यांचे डांबरीकरणा ऐवजी सिमेंट काॅंक्रीटीकरणासाठी सुधारीत ३७ हजार कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.तसेच नगराध्यक्षांचा कालावधी हा अडीच ऐवजी आता पाच वर्षे करण्यात आला आहे.तसेच सौरऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्लू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार

दरम्यान अजून काही निर्णय या प्रमाणे आहेत.विदर्भ , मराठवाड्यातील दुग्ध विकासाला गती,१४९ कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.तसेच  मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.डेक्कन काॅलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठा तील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना तसेच यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथिल करण्यात आली आहे.

Previous articleराज्यातील विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता
Next articleलाडकी बहीण योजना बाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here