पुणे दिनांक १३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सर्व सामान्य नागरिकांना फक्त एवढेच माहीत आहे की.एटीएम मशिन हे फक्त 💸 पैसे काढण्यासाठी वापरण्यास येते .मात्र आता एटीएम मशिन मधून चक्क रेशन धान्य मिळणार आहे.याला ग्रेन डिस्पेसिंग मशिन असे या मशिनचे नाव आहे.या मशिन द्वारे आता फक्त पाच मिनिटांत पन्नास किलो धान्याचे वितरण होणार आहे.तसेच या एटीएमवर २४ तास धान्य उपलब्ध असणार आहे.दरम्यान ओडिशा राज्य सरकारच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर एटीएमवर धान्याचे वितरण सुरू केले आहे.ओडिशा राज्यातील सर्व जिल्ह्यात या मशिन लावण्यात येणार आहे.असे ओडिशा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री यांनी सांगितले आहे.