Home Breaking News देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान, पुण्यातून सतिश...

देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान, पुण्यातून सतिश गोवेकर यांचा समावेश

217
0

पुणे दिनांक १४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतात उद्या ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे.त्यानिम्मिताने देशाची राजधानी दिल्लीत भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या हस्ते  अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान केला जातो.यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे.या वर्षी देखील राज्यातील तीन वरिष्ठ अधिकारी तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी तसेच कारागृह सेवेतील एक हवालदार यांना पोलिस सेवेत अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक 🏅 जाहीर करण्यात आले आहे.तसेच १७ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना अतुलनीय शौर्यतेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.यात पुण्यातील गुन्हे शाखा दोनचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर यांचा समावेश आहे.

दरम्यान राष्ट्रपती पारितोषिक मिळालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे चिरंजीव रामचबिला प्रसाद अतिरिक्त पोलिस महासंचालक.राजेंद्र बालाजीराव दहाळे.संचालक.सतिश रघुवीर गोवेकर सहाय्यक आयुक्त.संतोष वारीक.मुख्य अग्निशमन अधिकारी महाराष्ट्र.अशोक ओलंबा कारागृह हवालदार.तसेच कुणाला शंकर सोनवणे.उपविभागीय पोलिस अधिकारी.दीपक आवटे.पोलिस उपनिरीक्षक.कै. धनाजी होनमाने पोलिस उपनिरीक्षक ( मरणोत्तर)  नागेश कुमार एम.नायक पोलिस शिपाई.शकील युसुफ शेख.पोलिस शिपाई.विश्र्वनाथ पेंदम.पोलिस शिपाई. विवेक नारोटे.पोलिस शिपाई.मोरेश्र्वर पोटवी.पोलिस शिपाई.कैलास कुलमथे.पोलिस शिपाई.कोठला कोर्मी. पोलिस शिपाई.कोर्के वेलडी.पोलिस शिपाई.महादेव वानखेडे.पोलिस शिपाई.अनुज तारे अतिरिक्त पोलिस अधीक्षक.राहुल देव्हडे.पोलिस उपनिरीक्षक.विजय सकपाळ.पोलिस उपनिरीक्षक.महेश मिच्छा.हेड काॅन्सटेबल.समया असम.नायक पोलिस शिपाई. अशी आहेत.

Previous articleपुणे शहर गुन्हे शाखा दोनचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर यांना राष्ट्रपती पदक 🏅 घोषित
Next articleविशेष पोलीस महानिरीक्षक व संचालक डॉ.राजेंद डहाळे यांना राष्ट्रपती पारितोषिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here