Home Breaking News पुणे शहर गुन्हे शाखा दोनचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर यांना राष्ट्रपती...

पुणे शहर गुन्हे शाखा दोनचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर यांना राष्ट्रपती पदक 🏅 घोषित

84
0

पुणे दिनांक १४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहर गुन्हे शाखा दोनचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश रघुवीर गोवेकर यांना सन २०२४ च्या स्वतंत्रदिनी दिनांक १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींचे उल्लेखनीय सेवेबद्दल पोलिस पदक घोषित करण्यात आले आहे.या निमित्ताने त्यांचा सत्कार फुल गुच्छ देऊन आबा देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान सतिश गोवेकर हे १९८८ बॅचचे पोलिस अधिकारी आहेत.१९८८ पोलिस उपनिरीक्षक या पदावर त्यांची सरळसेवेतून नियुक्ती करण्यात आली होती.त्यानंतर सन २००७ मध्ये त्यांची पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी पुणे शहर येथे गुन्हे शाखा.दत्तवाडी पोलिस स्टेशन.कोंढवा पोलिस स्टेशन या ठिकाणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य केले.त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखा मुंबई शहर.तसेच स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण.व कामठी पोलिस स्टेशन.या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे.त्यानंतर सन २०१७ मध्ये त्यांची सहा.पोलिस आयुक्तपदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी प्रथम राज्य गुन्हे अन्वेषण विभाग.नवी मुंबई तसेच पुणे शहर येथे फरासखाना विभाग व सध्या गुन्हे शाखा येथे कर्तव्य बजावित आहेत.त्यांची एकूण सेवा कालावधी ही ३६ वर्ष पूर्ण झालेली आहेत.ते दिनांक ३१ /८/२०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यांनी आतापर्यंतच्या सेवा कालावधीत त्यांना एकूण ५०३ बक्षीस मिळाले आहेत.तसेच त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत अतिशय किचकट व संवेदनशील व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये उल्लेखनीय असं यश मिळवलं आहे.तसेच दिनांक १५ एप्रिल २००८ मध्ये मा.पोलिस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना दिनांक २६ जानेवारी २०११ रोजी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक 🏅 देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे.व त्यांना आता वैशिष्ट्यपूर्ण सेवा व उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पथकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल पोलखोलनामा डिजिटल मराठी मिडियाच्या सर्व टीमच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा

Previous articleस्वदेश न्यूज सैटलाइट टीव्ही चैनल महाराष्ट्रात व गोव्यात प्रसिद्ध गायक उदित नारायण व अनुराधा पौडवाल यांच्या उपस्थित सुरू
Next articleदेशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान, पुण्यातून सतिश गोवेकर यांचा समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here