Home Breaking News विशेष पोलीस महानिरीक्षक व संचालक डॉ.राजेंद डहाळे यांना राष्ट्रपती पारितोषिक

विशेष पोलीस महानिरीक्षक व संचालक डॉ.राजेंद डहाळे यांना राष्ट्रपती पारितोषिक

153
0

पुणे दिनांक १४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विशेष पोलिस महानिरीक्षक व संचालक महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे यांना भारत सरकारने उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक १५ ऑगस्टच्या अनुषंगाने जाहीर केले आहे.दरम्यान डॉ. डहाळे यांना यापूर्वी राष्ट्रपती भारत सरकारच्या वतीने गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पोलिस पदक 🏅 ते ” पोलिस अधीक्षक नंदुरबार” या पदावर कार्यरत असताना १५ ऑगस्ट २०१७ रोजी जाहीर केले होते. दरम्यान डॉ.डहाळे यांनी त्यांच्या ३१ वर्षाच्या सेवेमध्ये पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी उत्कृष्ट सेवेबद्दल दोन वेळा पोलिस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले आहे.डहाळे यांनी यापूर्वी पोलिस उपायुक्त सायबर गुन्हे पुणे शहर.या पदावर कार्यरत असताना सायबर फाॅरेन्सिक लॅबची निर्मिती मध्ये प्रमुख भूमिका बजावली होती.त्याबद्दल पोलिस आयुक्त पुणे शहर यांनी त्यांचा गौरव केला होता.तसेच अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग.पुणे शहर पदावर कार्यरत असताना त्यांनी पुणे गणेश उत्सव व इतर वेळी त्यांनी कायदा सुव्यवस्था उत्कृष्ट पणे ठेवल्याबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला आहे.त्यांनी यापूर्वी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग.राज्य गुप्तवार्ता विभाग व इतर विभागात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.

Previous articleदेशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान, पुण्यातून सतिश गोवेकर यांचा समावेश
Next articleकुस्तीपटू विनेश फोगटची याचिका फेटाळली,पदक हुकले ! भारताला मोठा धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here