Home Breaking News स्वदेश न्यूज सैटलाइट टीव्ही चैनल महाराष्ट्रात व गोव्यात प्रसिद्ध गायक उदित नारायण...

स्वदेश न्यूज सैटलाइट टीव्ही चैनल महाराष्ट्रात व गोव्यात प्रसिद्ध गायक उदित नारायण व अनुराधा पौडवाल यांच्या उपस्थित सुरू

76
0

पुणे दिनांक १४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) स्वदेशी न्यूज सैटलाइट टीव्ही चैनल महाराष्ट्रात व गोव्यात सुरू झाला आहे.या चैनलचे मुंबईत ऑफिस असून महाराष्ट्र व गोव्याचे कामकाज तेथूनच सुरू होणार आहे.दरम्यान मुंबईतील रेडिसन हाॅटेल मध्ये एक भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गायक उदित नारायण व अनुराधा पौडवाल हे उपस्थित होते.यांनी या चैननला शुभेच्छा दिल्या आहेत.सदरच्या चैनल हा हिंदी न्यूज साठी असून सर्व न्यूज या भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी मधूनच प्रसिद्ध होणार आहेत.

दरम्यान या चैनलची उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भालचंद्र शिरसाठ ( भाजप) तसेच आनंद दुबे शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे उपस्थित होते.यावेळी दुबे म्हणाले की  उत्तर भारतात स्वदेशी न्यूज चॅनलची चांगली लोकप्रियता आहे.आता नव्याने महाराष्ट्रात व गोव्यात  या चैनल सुरू होत आहे.माझ्या कडून या चैननला शुभेच्छा दरम्यान या चैनलचे प्रमुख जबाबदारी ही महाराष्ट्राची व गोव्याची युसुफ बावनगांववाला यांची असणार आहे.तसेच महाराष्ट्र व गोव्याचे मुख्य बातमीदार म्हणून संजीव कुमार तर फातिमा नकवी  बिजणेस हेड असणार आहे.मुंब‌ईचे मुख्य बातमीदार म्हणून उत्तम रणपिसे तर महाराष्ट्राचे मुख्य बातमीदार म्हणून फिरोज पिंजारी हे काम पाहणार आहेत.यावेळी मुख्य संपादक रवि प्रकाश श्रीवास्तव व गायक राघव कपूर.तसेच महाराष्ट्रातील स्वदेश चैलचे पत्रकार उपस्थित होते.यात चैनलचे पुणेचे चिफ ब्यूरो म्हणून प्रीतम शाह यांची निवड करण्यात आली आहे.पत्रकार आदित्य कदम.राकेश पगारे व प्रेम मोरे ( ठाणे पत्रकार) अमोल कांबळे ( नवी मुंबई पत्रकार) राजेंद्र त्रिमुखे (अहमदनगर व शिर्डी पत्रकार) खलील सुर्वे ( रायगड पत्रकार) अजमत सुफी ( गोवा राज्य मुख्य बातमीदार) हे सर्वजण उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एंकर सिमरन आहूजा यांनी खास शैलीत केले.

Previous articleपुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात ३ ते ४ बांगलादेशी तरुण घुसल्याने एकच खळबळ, त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Next articleपुणे शहर गुन्हे शाखा दोनचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर यांना राष्ट्रपती पदक 🏅 घोषित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here