पुणे दिनांक १५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या वरुन संपूर्ण देशात ठिक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत.आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या आंदोलनला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हिंसक वळण घेतले.आंदोलन स्थळी जमलेल्या जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली.तसेच पोलिसांवर देखील हल्ला केला.परिणामी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी 👮 यावेळी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
दरम्यान काल बुधवारी पश्चिम बंगाल आणि देशभरात बुधवारी रात्रीच्या सुमारास साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ‘ रिक्लेम द नाईट ‘ या मोहिमेचा भाग म्हणून निदर्शने सुरू झाली.या मोहिमेने सोशल मीडियाद्वारे प्रचंड वेग घेतला.हातात फलक घेऊन पीडितेला न्याय देण्याची मागणी करत समाजाच्या सर्व स्तरातील हजारो महिला रस्त्यावर उतरलेल्या होत्या.सुरुवातीला हे निदर्शने अत्यंत शांत पध्दतीने सुरू होते.परंतू काही वेळातच या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं . यातील जमावाने जबरदस्तीने बॅरीकेंटीग तोडून रुग्णालयात प्रवेश केला.व खुर्च्या तोडल्या व यावेळी इमर्जन्सी वाॅर्डची तसेच बाहेर उभ्या असलेल्या काही पोलिसांच्य गाड्यांची तोडफोड केली.यावेळी उग्र झालेल्या जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांनी 👮 लाठी चार्ज केला.व अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.दरम्यान या सर्व आंदोलनला कोलकाताचे पोलिस आयुक्त विनित गोयल यांनी या तोडाफोडीला सोशल मीडियावरील मोहिमेलाच जबाबदार धरले आहे.दरम्यान हे प्रकरण सीबीआय कडे सोपविण्यात आले आहे.तसेच सीबीआयची टीम कोलकाता येथे दाखल झाली असून त्यांनी काल या रुग्णालयात जाऊन चौकशीला देखील सुरुवात केली आहे.