Home Breaking News मुंबईला येणाऱ्या रेल्वे ट्रेनचा डबा झाला अचानकपणे वेगळा

मुंबईला येणाऱ्या रेल्वे ट्रेनचा डबा झाला अचानकपणे वेगळा

73
0

पुणे दिनांक १५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार गुजरातमधील अहमदाबाद वरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या डब्बल डेकरचा डब्बा रेल्वे ट्रेन धावत असताना अचानकपणे वेगळा झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान सुदैवाने यात कोणतीही प्रकारचा अपघात झाला नाही.व कोणीही प्रवासी जखमी झालेला नाही.सदरची घटना सूरतच्या सायनच्या जवळ आज गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.दरम्यान या नंतर रेल्वे प्रवाशां मध्ये भितीचे वातावरण होते.घटनेनंतर प्रवासी हे ट्रेनच्या डब्यातून खाली रेल्वे ट्रॅकवर येऊन उभे राहिले होते.घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.व वेगळा झालेला डब्बा पुन्हा जोडल्यानंतर सदरची ट्रेन ही मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.

Previous articleकोलकाता मध्ये आंदोलनाला हिंसक वळण, बॅरीकेंटीग तोडले.खुर्च्या तोडल्या रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न
Next articleमुंबईत अटलसेतूवरुन उडी मारत महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here