पुणे दिनांक १७ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे.त्यामुळे आज लव्ह जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी नांदेड.धुळे.धाराशिव.व मुंबईतील भांडुप या ठिकाणी बंदची हाक दिली आहे.यात लव्ह जिहादवर कडकपणे कायदा करावा.तसेच फेरीवाल्यांन विरुद्ध कारवाई करण्यात यावी.आता या मागणीसाठी आता राज्यातील सर्वच हिंदुत्ववादी संघटना आता पुढे आल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी 👮 राज्यातील अनेक हिंदुत्ववादी नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत.तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार राज्यात घडू नये म्हणून यासाठी पोलिसांकडून देखील विशेष काळजी घेतली जात आहे.