पुणे दिनांक १७ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्य सरकारच्या वतीने सध्या युद्ध पातळीवर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रक्षा बंधनच्या आधी महिलांच्या खात्यांवर सोमवारच्या आत जमा करण्यात येत आहे.व राज्य सरकारला लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाची ओवाळणी द्यायची आहे.व अनेक निराधार महिलांना आधार यामुळे होणार आहे.यासाठी अनेक महिलांनी रांगेत उभे राहून कागदपत्रांची पूर्तता देखील केली आहे.परंतू कोणताही अर्ज न भरता चक्क एका बेरोजगार भावाच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले असून यामुळे प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराची चांगलीच पोलखोल झाली आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आर्णी शहरातील जाफर शेख नावाच्या युवका च्या खात्यात.लाडकी बहिण योजनेचे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत.याबाबत जाफर यांने कोणत्याही प्रकारचा अर्ज न करता त्याच्या बॅक ऑफ बडोदाच्या खात्यात सदरची रक्कम जमा झाली आहे.दरम्यान या प्रकरणामुळे आर्णी गावात एकच खळबळ उडाली आहे.व प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराची चांगलीच पोलखोल झाली आहे.