Home Breaking News स्वारगेट ते कात्रज मेट्रो विस्तारिकरणाला केंदांची मंजुरी, वाहतूक कोंडी टळणार

स्वारगेट ते कात्रज मेट्रो विस्तारिकरणाला केंदांची मंजुरी, वाहतूक कोंडी टळणार

61
0

पुणे दिनांक १७ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यामध्ये पुणे मेट्रो प्रकल्पाचा टप्पा एक स्वारगेट ते कात्रज या विस्तरिकरणाला केंद्रीय मंत्री मंडळाने काल शुक्रवारी दिनांक १६ ऑगस्ट रोजी हिरवा कंदील दाखवला आहे.मंत्रिमंडाळाच्या झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.यामुळे स्वारगेट ते कात्रज भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत होणार आहे.

दरम्यान या मेट्रोच्या नवीन स्वारगेट ते कात्रज भूमिगत मार्गामुळे या भागातील रस्त्यांवर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी लक्षणिय रित्या कमी होणार आहे.तसेच या भागातील बस व रेल्वे स्टेशन.राजीव गांधी प्राणी शास्त्र उद्यान.तळजाई हिलाॅक टेकडी.मनोरंजन केंद्रे .व शैक्षणिक संस्था.आणी व्यावसायिक केंद्र जोडले जातील.सदरचा पुणे मेट्रो प्रकल्पा अंतर्गत टप्पा एक स्वारगेट ते कात्रज या ५.४६ किलो मीटर लांबीच्या भूमिगत मार्गाच्या विस्ताराला देखील मंत्री मंडळाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे.सदरचा प्रकल्प हा २९ फेब्रुवारी २०२९ प्रर्यत पुर्ण होईल या प्रकल्पा साठी २९५४.५३ कोटी रुपये खर्च होतील हा विस्तारीत मार्ग लाईन-१ बी म्हणून ओळखला जाईल.यामुळे मार्केट यार्ड.बिबवेवाडी.बालाजीनगर.आणि कात्रज उपनगर हे भाग मेट्रोने जोडले जाणार आहे.या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी टळणार आहे.

Previous articleमुंबईत अटलसेतूवरुन उडी मारत महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न
Next articleरेल्वे ट्रॅकवर मोठ्या दगडामुळे साबरमती एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरून खाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here