पुणे दिनांक १७ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी या घटनेचा निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन व आयएमए डॉक्टरांच्या संघटनांनी आज २४ तासांचा बंद पुकारला आहे.त्या मुळे आज पुणे शहरातील रुग्णालयातील शस्त्रक्रिया या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.त्यामुळे परिणामी शहरातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.मात्र या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.असे आयएमएसह डॉक्टर संघटनांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान कोलकाता येथील जी कार वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.या घटनेचा निषेध करण्यासाठी देशातील सर्वच डॉक्टरांनी बेमुदत काम बंद आंदोलन केले होते. आता या आंदोलनाला सर्व डॉक्टरांनी पाठिंबा दिला आहे.आज पुणे शहरातील व जिल्ह्यातील खासगी डॉक्टर हे सहभागी होणार आहेत.त्यामुळे पुढील २४ तासात पुणे शहर व परिसरातील रुग्णसेवाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.परंतू अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.सदरची रुग्णसेवा ही शनिवारी सकाळी ६ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असणार आहे. रुग्णालयातील बाह्य रुग्णसेवा बंद राहणार आहे.