Home Breaking News ‘… अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्या अडवू’काॅग्रेसचा अल्टीमेटम

‘… अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्या अडवू’काॅग्रेसचा अल्टीमेटम

121
0

पुणे दिनांक १८ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील शिवाजीनगर येथील एसटी बस स्थानक पूर्वीच्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी काॅग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या करीता राज्य सरकारला थेट १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्या अडवण्याचा इशारा माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला आहे.दरम्यान महामेट्रोच्या कामा करीता शिवाजीनगर येथील एसटी बस स्थानका चे सन २०१९ मध्ये स्थलांतर करण्यात आले होते. पण एसटी बस स्थानकाचे काम पूर्ण होऊन तब्बल दोन वर्षे झालेतरी बसस्थानक पूर्वीच्या जागेवर अद्याप स्थलांतरित करण्यात आली नाही.

Previous articleपुण्यात विजेच्या कडाक्यासह मुसळधार पाऊस सुरू
Next articleराहुल गांधींना उद्या शिवाजीनगर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here