Home Breaking News कसारा घाटात दुधाचा टॅंकर ३०० फूट खोल दरीत कोसळून ५ जणांचा घटनास्थळीच...

कसारा घाटात दुधाचा टॅंकर ३०० फूट खोल दरीत कोसळून ५ जणांचा घटनास्थळीच मृत्यू

65
0

पुणे दिनांक १८ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार नासिक मुंबई महामार्गावर कसारा घाटात भीषण अशी दुर्घटना घडली असून.नाशिकवरुन मुंबईकडे जाणारा दुधाचा टॅंकर थेट ३०० फूट दरीत कोसळून मोठी घटना घडली आहे.यात टॅंकर मधील एकूण ५ जणांचा मृत्यू घटनास्थळीच झाला आहे ‌तर अन्य ४ जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.या अपघातानंतर इगतपूरी मध्ये एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पाॅईंट जवळ टॅंकर चालकाचा ताबा सुटल्याने घटना घडली आहे.

दरम्यान या अपघाताबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर रुट पेट्रोलिंग टीम .आपत्ती व्यवस्थापन टीम.व महामार्ग पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.बचाव पथकाकडून दोरीच्या सहाय्याने खोल दरीत उतरुन बाहेर काढले आहे.अजून ३ ते ४ जण खोल दरीत असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान यातील जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.तर मृत्यू झालेल्या पाच जणांचे शव हे पोस्टमार्टम करीता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
Previous articleकोलकाता मेडीकल कॉलेज बलात्कार व हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २० ऑगस्टला सुनावणी
Next articleपुण्यात विजेच्या कडाक्यासह मुसळधार पाऊस सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here