Home Breaking News कोलकातातील मेडिकल कॉलेजच्या घटनेनंतर गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर पोलिसांना दोन तासांचा द्यावा लागणार...

कोलकातातील मेडिकल कॉलेजच्या घटनेनंतर गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर पोलिसांना दोन तासांचा द्यावा लागणार रिपोर्ट

76
0

पुणे दिनांक १८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कोलकाता येथील मेडिकल कॉलेज मधील एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराची घटना व नंतर करण्यात आलेल्या खूनप्रकरणी संपूर्ण जगभरातून मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या आंदोलना मुळे व संताप व्यक्त केल्याने.कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे.त्यामुळे आता केंद्र सरकारने चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहे.व केंद्रीय गृहमंत्रालयाने आता देशभरातील सर्व पोलिस दलांना निर्देश दिले आहेत.आता प्रत्येक दोन तासाला  आपल्या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा एक रिपोर्ट गृह मंत्रालयाला पाठवालला लागणार आहे.सर्व देशातील व राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना ते बंधनकारक असेल.

दरम्यान कायदा व सुव्यवस्थेवर आता बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आता मोठे पाऊल उचलले आहे.या आदेशामध्ये सतत घडणाऱ्या अपडेट वर भर देण्यात आलेला असून सर्व पोलिस दलांना ई- मेल फॅक्स किंवा व्हाॅट्स‌अपद्वारे मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला माहिती पुरवावी लागेल.देशात कुठे काय घडतंय आणि त्यावर तातडीने कोणते पावले कशी उचलता यासाठी.निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान कोलकाता येथील मेडिकल कॉलेज मध्ये संताप आणणारी घटना घडल्यानंतर उशीरा का होईना केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाला हे सुचलेले शहाणपण म्हणता येईल.

Previous articleराजस्थानात शाळा व इंटरनेट सेवा बंद,कलम १४४ लागू
Next articleकोलकात्यात आजपासून कलम १६३ लागृ , ममता बॅनर्जी विरोधकांच्या निशाण्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here