Home Breaking News खासगी लक्झरी बस व मॅक्सपिक‌अपची समोर समोर भिषण धडक, रक्षाबंधनला निघालेल्या १०...

खासगी लक्झरी बस व मॅक्सपिक‌अपची समोर समोर भिषण धडक, रक्षाबंधनला निघालेल्या १० मजुरांचा मृत्यू ३७ जण गंभीर रित्या जखमी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

68
0

पुणे दिनांक १८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरात एक भीषण अपघात झाला आहे.यात खासगी कंपनी ची बस  व मॅक्स पिक‌अपची समोरा समोर धडक ही  सलेमपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. यात १० जणांचा मृत्यू झाला आहे.यात मॅक्स पिक‌अपचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.यातील जखमी पैकी काहीजणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान सदर अपघात प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार.यातील अपघातग्रस्त मजूर हे गाझियाबाद येथील एका कंपनीत काम करणारे कामगार होते.ते सोमवारी असलेल्या रक्षाबंधना करीता घरी जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला.व रक्षाबंधना आधीच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने यात १० जणांचा मृत्यू झाला आहे.यात अजून ३७ जण गंभीर रित्या जखमी आहेत.यातील अनेकांची प्रकृती ही चिंताजनक आहे.त्यामुळे यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यातील  मृत्यू झालेल्या १० जणांना पोस्टमार्टम साठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Previous articleराजस्थानातील १०० हाॅस्पीटलला बाॅम्बच्या सहाय्याने उडविण्याची धमकी
Next articleकोलकाता मेडीकल कॉलेज बलात्कार व हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २० ऑगस्टला सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here