Home Breaking News पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपने दाखवले काळे झेंडे

पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपने दाखवले काळे झेंडे

124
0

पुणे दिनांक १८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यात जनसन्मान यात्रा सुरू केली आहे.त्यांची यात्रा आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात ही जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मात्र आज अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी काळे झेंडे दाखवल्याची घटना घडली आहे.तसेच यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आली असता यावेळी भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले.यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली आहे.या घटनेनंतर नारायणगाव मध्ये भाजपच्या पदाधिकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले.

Previous articleकोलकात्यात आजपासून कलम १६३ लागृ , ममता बॅनर्जी विरोधकांच्या निशाण्यावर
Next articleपुण्यातील मटका व्यावसायिक नंदू नाईकांच्या जनसेवा हाॅटेलमागील अड्यावर गुन्हे शाखेचा छापा,आठ जणांच्या मुसक्या आवळून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here