Home Breaking News पुण्यातील मटका व्यावसायिक नंदू नाईकांच्या जनसेवा हाॅटेलमागील अड्यावर गुन्हे शाखेचा छापा,आठ जणांच्या...

पुण्यातील मटका व्यावसायिक नंदू नाईकांच्या जनसेवा हाॅटेलमागील अड्यावर गुन्हे शाखेचा छापा,आठ जणांच्या मुसक्या आवळून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

114
0

पुणे दिनांक १८ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील शिवाजी रोडवरील जनसेवा हाॅटेलमागील मटका व्यावसायिक नंदू नाईक याच्या मटक्याच्या अड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारुन एकूण आठ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत यात मटका खेळणारे व मटका व्यावसायिक नंदू नाईकचा समावेश आहे.यात एकूण २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरच्या  मटका धंद्यावर यापूर्वी देखील पोलिसांनी 👮 छापे घालून कारवाई केली होती.परंतू परत काहीच दिवसात नंदू नाईकचा मटका अड्डा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान यात अटक करण्यात आलेल्या लोकांची नावे १) संतोष लक्ष्मण गुजर ( वय ५२ रा.शिवाजीनगर गावठाण पुणे) २) रविंद्र धोंडीबा गजदाणे ( वय ४२.रा.पिरंगूट पुणे) ३) गोविंद अनंतराव वेदपाठक ( वय ४३ रा.सासवड जि. पुणे) ४) राजू बबनराव गोरे ( वय ३२ रा.पिरंगूट पुणे ) ५) किसन दत्तात्रय तावरे ( वय ४३ रा.पिरंगूट पुणे ) ६) रोहन किसन तावरे ( वय १९ रा.धाराशीव ) ७) निलेश कृष्णाजी रणपिसे ( वय  ५२ रा.सांगवी )८ ) नंदकुमार बाबुराव नाईक ( वय ७६ रा.शुक्रवार पेठ पुणे ) अशी आहेत.या बाबत गुन्हे शाखेचे युनिट एकचे पोलिस हवालदार त्रिंबक बामगुडे यांनी खडक पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. यातील नंदूकुमार नाईक हा पुण्यातील शुक्रवार पेठेतील मटका किंग म्हणून ओळखला जातो.त्यांचे पुणे शहरातील अनेक ठिकाणी मटक्याचे अड्डे सुरू आहेत. पुण्यातील शिवाजी रोडवरील शुक्रवार पेठेत असणाऱ्या त्यांच्या मालकीच्या जनसेवा भोजनालया च्या मागील जागेत मोठ्या प्रमाणावर मटका अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १ व २ च्या अधिकारी यांनी सदर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापेमारी केली असता त्याठिकाणी कल्याण ओपन मटका जुगाराच्या चिठ्या ह्या सर्रासपणे दिल्या जात होत्या.पोलिसांनी जुगार साहित्य व मोबाईल व रोकड असा एकूण २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हर्षल कदम करीत आहेत.

Previous articleपुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपने दाखवले काळे झेंडे
Next articleराजस्थानातील १०० हाॅस्पीटलला बाॅम्बच्या सहाय्याने उडविण्याची धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here