पुणे दिनांक १८ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते राहुल गांधींना उद्या दिनांक १९ ऑगस्ट रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान लंडनमध्ये राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल विधान केले होते.त्यावर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी आक्षेप घेत पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयात धाव घेतली होती.उद्या याबाबत राहुल गांधी यांना त्यांचे मत मांडण्याचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास दोन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.